मी? कोण?

उद्वेग क्लेश कल्लोळ,
भणभणलय डोक
घेतलाय ना निर्णय 
केलं ना ते जे लिहिता पण येत नाही 
मग, मग का ही कलकल 
डोक्यात शरीरात 

तुटला तो धागा 
सुटला हातातून 
मुद्दामच तोडला 
आता जाईल ती पतंग 
उडत उडत नजरेआड होईपर्यंत 

मग आत हे काय अटकलं आहे?
अगदी घशात खोल?
काही गिळलं की दुखतं मला 
चांगलं-चुंगलं गोड तिखट 
सगळं काही खुपतं 
अन तरी खातेय मी 

दगड झालेय जणू 
नाहीतर फणस म्हणा 
काटेरी, जड 
आलं कोणी जवळ 
तर लागणारच, होणारच जखम 

मी अशीच होते,
की आता झाली आहे 
माझं मलाच कळत नाही 
आरशातले हे निर्विकार डोळे 
माझे मात्रं नाही 
माझे मात्रं नाही 

युगंधरा 
२३/०१/२०२२

Comments